पंढरपूर : पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात बोलताना बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मोठे वक्तव्य केले होते.
या कार्यक्रमात बोलताना, शहाजीबापू या्ंनी सांगोल्यातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना आमदार करा आणि मला विधान परिषदेवर पाठवा अशी मागणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याकडे मागणी केली होती.

दरम्यान, आता आमदार शहाजी पाटील यांनी दोन दिवसात घुमजाव करत आपण येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार असणार आहे जाहीर केले. शिवाय मी केलेली वक्तव्य हे गंमतीने केले असल्याचे कारण देखील आमदार शहाजीबापूंनी दिले आहे.