मुंबई : नुकतंच राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं. त्यातून त्यांनी अंधेरी पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने एक भावनिक आवाहन केलं. आता पुन्हा एकदा मनसेच्या वतीने देवेंद्र फडणवीसांना मागणी पत्र लिहिण्यात आले आहे.
मनसे नेते मनोज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याचे आवाहन केले आहे, तसेच, सणासुदीच्या काळात पोलिसांना आर्थिक पाठबळ मिळावे, व त्यांचे आर्थिक समाधान व्हावे, असे मनोज चव्हाण यांनी या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, आजच्या पत्रातील मागणीवर देवेंद्र फडणवीस यांची काय प्रतिक्रिया असणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.