उत्तराखंड : उत्तराखंडच्या केदारनाथपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गरूरचट्टी या गावात सकाळच्या सुमारास आर्यन कंपनीचे एक खासगी हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टर दुर्घटनेत सहा जण मृत्युमुखी पडलेत. एकूण आठ जण या हेलिकॉप्टरमध्ये होते, अशी माहिती समोर येत आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, आर्यन कंपनीच्या हेलिकॉप्टरमध्ये 8 भाविक होते. या भाविकांना घेऊन हे हेलिकॉप्टर जात असताना काळानं 6 प्रवाशांना घाला घातला. हेलिकॉप्टर दुर्घटना झालेल्या ठिकाणी बचाव पथकही रवाना झालंय. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर आग भडकली होती. दुर्घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरु आहे.

दरम्यान, नेमकी ही दुर्घटना कशामुळे घडली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टर कोसळलं असावं, अशी शंका व्यक्त केली जाते आहे.