मुंबई: पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली करण्याच्या मुद्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एकमत नसल्याची माहिती समोर आली आहे.
रविवारी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली करण्याच्या मुद्यावर जवळपास दोन तास खलबत करुनही दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले नसल्याचे समजत आहे.

दरम्यान, राज्यातील पोलिस भरती हा राज्याच्या राजकारणातील महत्वाचा मुद्दा आहे. महाविकास आघाडीच्या काळात देखील याच मुद्यावरुन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मतभेद झाले होते.