मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एका वृत्तापत्राला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तर देताना अनेक मुद्यांवर वक्तव्य केले आहे.
यावेळी रोहित पवार म्हणाले, “मला जिल्हा परिषद निवडणुकीत पहिले तिकीट अजित पवार यांनी दिले. मला आमदारकीचे तिकीट त्यांनीच दिले, एवढेच नव्हे तर माझं लग्न देखील अजित पवार यांनीच जमवलं आहे. तुम्हाला प्रगती करायची असते तेव्हा तुम्ही कुटुंबात स्पर्धा करू शकत नाही. आमचे ध्येय वेगळे आहे. सुप्रियाताईंचे टार्गेट लोकसभा आहे. अजित पवार राज्यात काम करतात आणि मी माझ्या मतदारसंघात काम करतो. पण विरोधकांना आमचे कुटुंब फोडायचे आहे. कुटुंबाअंतर्गत वाद झाले तर पक्ष फुटेल असं विरोधकांना वाटतं. शिवाय शिवसेनेनंतर राष्ट्रवादी पक्ष विरोधकांचा टार्गेट असून त्यांनी ज्याप्रमाणे शिवसेना पक्ष फोडला त्याप्रमाणे त्यांना आमचा पक्ष फोडायचा असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.
