Latest Marathi News

आजचे राशीभविष्य, मंगळवार १८ ऑक्टोबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 662

मेष:
आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. मनाची द्विधावस्था राहील. संपूर्ण खात्री करूनच संमती द्या. नसती काळजी करत बसू नका. विरोधक मन बेचैन करतील.

 

वृषभ:
विनाकारण अडचणी सामोर्‍या येऊ शकतात. कामाचा कंटाळा करू नका. पित्त प्रकृतीत वाढ संभवते. विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळेल. आनंदाची अनुभूति घ्याल.

Manganga

 

मिथुन:
मनोबल वाढीस लागेल. भावंडांशी मैत्रीचे नाते ठेवा. वाहन चालवताना काळजी घ्या. व्यवहार व नाते यात गफलत करू नका. दिनक्रम व्यस्त राहील.

 

कर्क:
भावनिक निर्णय घेऊ नका. जुनी येणी वसूल होतील. व्यावसायिक योजना गतिमान होतील. आजचा दिवस अनुकूल राहील. वरिष्ठांना नाराज करू नका.

 

सिंह:
मानसिक शांतता राखावी. प्रतिस्पर्ध्यावर मात कराल. अपचनाचा त्रास संभवतो. नवीन कामात जपून पाऊले टाका. कुटुंबासोबत काळ व्यतीत कराल.

 

कन्या:
कामाची योग्य आखणी करावी. प्रखर मत नोंदवताना काळजी घ्या. संयम व धैर्य राखावे. गैरसमज होऊ देऊ नका. हातातील काम पूर्ण झाल्याने समाधान मिळेल.

 

तूळ:
मिळकतीचे नवीन मार्ग सापडतील. बोलण्यातून मान कमवाल. लोकांना योग्य तोच सल्ला द्यावा. कामाची दगदग राहील. थोडा स्वत:साठी वेळ काढावा.

 

वृश्चिक:
गुंतवणुकीकडे लक्ष द्यावे. वाणी संयमित ठेवा. प्रिय व्यक्तीच्या भेटीचे योग. गरजेच्या वस्तु खरेदी कराल. वडीलधार्‍यांचे सल्ले ऐकावेत.

 

धनू:
कौटुंबिक वातावरण तप्त राहील. पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. कार्यालयीन व्यक्तींशी मतभेद टाळावेत. घरासाठी काही खरेदी कराल.

 

मकर:
जागेच्या व्यवहारात गाफिल राहू नका. थोडीफार धावपळ संभवते. कौटुंबिक कामाचा भार उचलावा. आरोग्याकडे लक्ष द्या. आजचा दिवस अनुकूल असेल.

 

कुंभ:
वाहनाचे काम निघू शकते. क्षुल्लक वादाला तोंड फुटू देऊ नका. व्यवसायाकडे दुर्लक्ष करू नका. व्यापारी वर्गाला दिलासादायक दिवस. कौटुंबिक शांतता जपावी.

 

मीन:
प्रवास सत्कारणी लावाल. आजचा दिवस अनुकूल असेल. कामाची व्याप्ती वाढेल. मुलांचे प्रश्न मार्गी लावाल. व्यवसायिकांनी संधी ओळखावी.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!