मुंबईः अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीतून भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी अर्ज मागे घेतला आहे. आता या निर्णयावर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्या म्हणाल्या, ‘ उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून ऋतुजा लटके यांची उमेदवारी नक्की केली. त्यानंतर सव्वा महिना महाराष्ट्रात राजकीय घमासान पहायला मिळाले. कोर्टाने महापालिकेचं तोंड आपटवलं. त्यानंतर मनसेचे राज ठाकरेंचं पत्र, देशातले मोठे नेते शरद पवारांनीही तेच सांगितलं. त्यानंतर भाजपाला काळजावर दगड ठेवून हा निर्णय घ्यावा लागला, तरीही जी संवेदनशीलता दाखवली, त्यासाठी आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांचे आभार मानते.तसेच, स्व. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांची येथे बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. मात्र भाजपने हा निर्णय सहजा सहजी घेतला नाही, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.
