मुंबई: भाजपचे अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. भाजपच्या या निर्णयावर उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शंका व्यक्त केली आहे.
संजय राऊत म्हणाले, “राज ठाकरेंनी फडणवीसांना लिहिलेलं पत्रं स्क्रिप्टचा भाग होता. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजपनं वैयक्तिक सर्वे केला होता. ठाकरे गट मोठ्या फरकाने जिंकेल हे भाजपला कळलं होतं. पराभवाची चाहूल लागल्याने भाजपने उमेदवार मागे घेतला, असे संजय राऊत यांनी दावा केला.

दरम्यान, संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होती. त्यासाठी ते सत्र न्यायालयात आले होते. यावेळी कोर्ट परिसरात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला.