आटपाडी : आटपाडी च्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयात मध्यवर्ती युवा महोत्सवाला शानदार सुरुवात झाली असून काल सायंकाळी सुरू असलेल्या लोक कला महोत्सव उपस्थितांनी टाळ्या, शिया, वाहवा, वाहवा ची दाद दिली.
तर आज दुसऱ्या दिवशी महाविद्यालयाच्या परिसरामध्ये मात्र पुणे, मुंबई, दिल्ली नंतर 5G सेवा उपलब्ध झाल्याने याठिकाणी नागरिकांची झुंबड उडाली होती.परंतु नंतर खरे कारण समजल्यावर मात्र उपस्थित नागरिकांनी वाहवा केली.
आज महाविद्यालय परिसरामध्ये सांघिक रचना प्रकार सुरू झाला. यामध्ये विद्यार्थ्यांनी कल्पकतेने अनेक उपलब्ध असलेल्या सामुग्री वर विविध रचना तयार केल्या होत्या. यामध्ये 5G सेवा देणारा मोबाईल टॉवर उभा केला होता. तर याच ठिकाणी मोबाईल टॉवर चे दुष्परिणाम सांगणारी रचना देखील उपस्थितांना परिस्थितीची जाणीव करून देत होती.

आपली मराठी याची माहिती देणारी रचना, मराठी शाळा टिकल्या पाहिजेत ही रचना तसेच सर्व धर्म समभाव सांगणारी रचना देखील खास होत्या.