मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी अखेर उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्यानंतर भाजपच्या या निर्णयाचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
शरद पवार म्हणाले, मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, अशी माझी मागणी नव्हती. मी मागणी कशी करणार? मी फक्त भाजपला तसं सूचवलं होतं. सूचवल्यानंतर त्यातून सकारात्मक निर्णय घेतला जाईल याची मला खात्री होती. तो सकारात्मक निर्णय झाला. तसेच, कुणाच्याही कोंबड्यांनी दिवस उगवला तरी माझी हरकत नाही, असे म्हणत पवार यांनी मिश्कील टिपण्णी केली.

दरम्यान,राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.