उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील गोमतीनगर पोलीस स्टेशन परिसरात एका आश्रमात एका साध्वीने चार साधकांवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, वास्तविक पीडित साध्वी ही प्रयागराज जिल्ह्यातील करचना येथील रहिवासी आहे. पीडितेने सांगितले की, येथे येण्यापूर्वी ती मथुरेतील एका आश्रममध्ये राहत होती. त्याचवेळी वर्षभरापूर्वी प्रयागराजमध्ये माघ जत्रेत त्यांची एका साधिकेशी भेट झाली. त्या साधिकेने ती लखनऊच्या गोमतीनगर येथील जानकी मंदिरातून आल्याचे सांगितले होते.तसेच, माघ मेळ्यानंतर ती सावनमध्ये साधिकेला भेटली. ती साधिका वृंदावन येथील रुक्मणी बहार आश्रमात आली होती. त्यानंतर लखनऊ येथील आपल्या आश्रमाच्या महंताने आपल्याला आपल्या आश्रमात बोलावल्याचे साधिकेने सांगितले. 4 ऑक्टोबर रोजी साधिका जी तिला लखनऊ घेऊन आली होती ती कुटुंबातील कोणीतरी आजारी असल्याचे सांगून वाराणसीला गेली. 4 ऑक्टोबर रोजी साधकांनी तिच्या जेवणात मादक पदार्थ मिसळले. त्यानंतर ती बेशुद्ध पडल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर रात्री जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ती नग्न होती. याशिवाय, चारही साधक तिथे उभे होते. तिने विरोध केला असता जीवे मारण्याची धमकी देऊन गप्प केले.

दरम्यान, या प्रकरणी गोमतीनगर पोलिसांनी साध्वीच्या तक्रारीवरून चार साधकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. साध्वींच्या आरोपांची चौकशी सुरू असून, त्यानंतरच आरोपींवर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.