Latest Marathi News

BREAKING NEWS

आटपाडी : तहसीलदारांची अवैध वाळू उपशा विरुद्ध धडक कारवाई : पिकअप सह बैलगाडी केली जप्त

0 3,521

आटपाडी : आटपाडी तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्याविरुद्ध आटपाडीच्या तहसीलदार बी.एस. माने यांनी धाक कारवाई केली असून टाटा इंट्रा पिकअप वाहणासह बैलगाडी व वाळू धुण्यासाठी वापरले जाणारे इंजिन जप्त करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी तालुक्यातील मौजे निबवडे येथे दिनांक 13 रोजी औढा पात्रामध्ये अवैध वाळू उत्खनन करुन वाहतूक सुरु असल्याची माहिती मिळाली. या ठिकाणी तात्काळ भेट दिली असता सदर ठिकाणी 5 ब्रास वाळू साठा आढळून आला तसेच सदर ठिकाणी वाळू धुण्यासाठी असलेले इंजिन आढळून आलेने सदर इंजिन जप्त करणेत आलेले आहे.

Manganga

मौजे दिघंची येथील माणनदी पात्रातून दिनांक 15 रोजी अवैध वाळू वाहतूक करणारे बैलगाडी व मौजे बोंबेवाडी येथील माण नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे विना क्रमांचे टाटा इंट्रा पिकअप हे वाहन जप्त करुन कारवाईसाठी तहसिल कार्यालयात जमा केली आहेत.

सदर अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीच्या अनुषंगाने संबंधितावर दंडात्मक कारवाई करणेची कार्यवाही कार्यालयाकडून सुरू आहे. सदरची कारवाई ही तहसिलदार यांनी स्वतः व त्यांचे मार्गदर्शनाखाली अवैध गौण खनिज प्रतिबंधात्मक पथकाकडून कारवाई करणेत आलेली आहे.

तसेच कांही वाळू तस्कर स्वतः वाळू चोरी कारवाईमध्ये सामील असून देखील लोकांमध्ये जाणीव पूर्वक जनमाणसांत शासनाची प्रतिमा मलिन करणेच्या हेतून व प्रशासनावर दबावतंत्राचा वापर करुन विना कारवाई स्वता:चे वाहन सोडविणेसाठी विविध प्रसार माध्यमाचा, वर्तमानपत्राचा वापर करुन प्रशासनाच्या विरुध्द खोटया बातम्या पसरवून शासनाची व अधिकारी वर्गाची बदनामी केलेची बाब या कार्यालयाचे निदर्शनास आली असलेने त्यांना या कार्यालयाकडून प्रशासनाची बदनामी केले बाबत रितसर नोटीस देण्यात आलेली असल्याचे तहसीलदार बी.एस. माने म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!