“तुझे दुसऱ्याशी लग्न जमले आहे, मी जगून तरी काय करू”: लॉजवर गेलेल्या प्रेमीयुगुलामधील तरुणाने केले भयंकर कृत्य!
पुणे : सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गोळेवाडी येथील एका लॉजवर एक प्रेमीयुगुलामधील तरुणाने प्रेयसीचा दुपट्टा घेवून गळफास लावत आत्महत्या केली. साकिब (२५) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. तो आळंदी रोड येथील दिघी येथे राहत होता.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, आत्महत्या केलेल्या तरूणाचे त्याच्या प्रेयसीसोबत तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आज सकाळी हे प्रेमीयुगुल गोळेवाडी येथील एका लॉजवर आले होते. त्यावेळी त्या दोघांमध्ये लग्न करण्यावरून खटके उडाले. तुझे दुसऱ्याशी लग्न जमले आहे, मी जगून तरी काय करू, असं म्हणत एका तरूणाने त्याच्या प्रेयसीचा दुपट्टा घेवून गळफास लावत आत्महत्या केली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिसांनी तपास सुरू केला असून तरूणाचा मृतदेह ससून रूग्णालयात पाठवला आहे.