आटपाडी : आटपाडी च्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयात सुरू असलेल्या मध्यवर्ती युवा महोत्सवाला शानदार सुरुवात झाली असून आज सायंकाळी सुरू असलेल्या लोक कला महोत्सवला उपस्थितांनी टाळ्या, शिट्या, वाहवाची दाद दिली.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर च्या ४२ व्या युवा महोत्सवात पहिल्या दिवशी श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या ग. दि. माडगूळकर मुख्य रंगमंचावर लोककला स्पर्धा रंगल्या.
यामध्ये सुरुवातीला कॉलेज कोड 209 यांनी ‘नटले तुमच्या साठी’ , ‘गाडी आणि बुरख्याची’ या लावणीने सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थिनी यांनी सादर केलेल्या या लावणीला मोठा प्रतिसाद मिळाला.तर, कोड क्र. २०९ या कॉलेज ने मोहरम नृत्य सादर केले. यालाही मोठा प्रतिसाद मिळाला.