“राज्यात सध्या ओरबडनं सुरु आहे, तरसांच्या तावडीत हत्ती सापडावा अशी स्थिती झाली आहे”: ‘यांचे’ मोठे वक्तव्य!
मुंबई :सध्याच्या राजकीय स्थितीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे.
राज ठाकरे म्हणाले, “सध्याची राजकीय परिस्थिती तुम्ही पाहत आहात. राज्याचा कारभार करताना रयत महत्त्वाची असते. मात्र सध्या ओरबडनं सुरु आहे ते थांबलं पाहिजे आहे. सगळ्यांना नगरसेवक व्हायचंय, आमदार व्हायचंय पण उद्देश काय? हे या लोकांकडे उत्तर नाही. हे ओरबाडनं थांबलं पाहिजे. निवडणूक लढवायला, पक्ष चालवायला पैसा लागतो, पण असा किती लागतो. तरसांच्या हातात एखादा हत्ती सापडावा अशी राज्याची स्थिती आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.