आटपाडी : आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथील श्री.सद्गुरू साखर कारखान्यावर बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या थकीत २३ कोटी रक्कमेच्या बाबतीत आंदोलन करण्यात आले.
राजेवाडी येथील श्री. सद्गुरू साखर कारखान्याने शेतकऱ्यांना २३ कोटी रुपयांची थकीत बिले देणे बंधनकारक आहे. परंतु साखर कारखान्याने शेतकऱ्यांची फसवणूक करून एक टक्का रेकोरीचा दर खाल्ला असल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिल्याने त्याबाबत पुन्हा एकदा बैठक घेण्याचे आश्वासन साखर कारखान्याच्या वतीने देण्यात आले आहे.
जर साखर कारखान्याने एक टक्का रेकोरीची रक्कम नाही दिली तर बळीराजा शेतकरी संघटना कारखानदारास राज्यात फिरू न देण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनास बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन बागल, प्रदेश युवक अध्यक्ष डॉ. उन्मेष देशमुख, सांगली जिल्हा अध्यक्ष डॉ. दिगंबर मोरे, सिंह सेनेचे बंडू हिप्परकर, धनाजी लोहार, सांगोला तालुका उपाध्यक्ष व शेतकरी बांधव उपस्थित होते.