Latest Marathi News

BREAKING NEWS

 

“….म्हणून भाजपनेच मनसेला पत्र पाठवायला सांगितलं असेल”!

0 434

मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक अवघ्या काही दिवसांवरती आली असतानाच भाजपने ही पोटनिवडणूक लढवू नये, अशी विनंती मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी केली आहे. याबाबतच राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.

 

 

 

सावंत म्हणाले, ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर करताना शिंदे गट आणि भाजपने किती गलीच्छ राजकारण केलं. दबाव नव्हता मग मंजूर करा आदेश का नाही दिले दबाव होता. इतका छळवाद झाला तेंव्हा राज ठाकरे का शांत होते असा सवाल उपस्थित करत आता भाजपला पराभव होत आहे असं वाटतं आहे. त्यामुळे त्यांनीच आता तुम्ही आम्हाला पत्र पाठवा आणि आम्ही माघार घ्या असं मनसेला सांगितलं असेल असा आरोप देखील सावंत यांनी यावेळी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.