नवी मुंबई: नवी मुंबईच्या पनवेल भागात राहणाऱ्या एका 62 वर्षीय वृद्धाने आपल्याच साडे चार वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, आरोपी आजोबा हा प्रत्येक शनिवारी रविवारी पनवेल तालुक्यातील आपल्या मूळ गावी पत्नी आणि नातीसोबत जात होता. या दरम्यान हा नराधम आजोबा संधी साधून आपल्या नातीसोबत लैंगिक चाळे करत होता. पीडित मुलीला लघुशंका करण्यास त्रास झाल्याने आईने विचारणा केली असता सदर प्रकार समोर आला. पीडित मुलीच्या आईने सदर प्रकारची माहिती आपल्या पतीला दिली होती. मात्र पतीने आरोप खोडून काढत पत्नीला गप्प केले.
दरम्यान, सदर प्रकार वाढल्यावर आईने पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी लैंगिक अत्याचार आणि पॉक्सो कलमाअंतर्गत नराधम आजोबावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र 15 दिवस उलटूनही पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही.