मुंबई: भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केलेली असताना मनसेकडून भाजपने ही पोटनिवडणूक लढवू नये, अशी विनंती करण्यात आली आहे. याबाबतच राज ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहलं आहे. याच पत्रावर आता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीस म्हणाले, आशिष शेलार हे राज ठाकरेंना भेटले आणि भाजपच्या उमेदवारला पाठिंबा द्यावा अशी विनंती केली. त्यानंतर राज ठाकरे यांनी मला पत्र लिहिले. मात्र, याबाबत मी एकटा निर्णय घेऊ शकणार नाही. आम्ही उमेदवार घोषित केला आहे. या स्टेजला भूमिका मला घेत येत नाही, पक्षात चर्चा करावी लागेल, मुख्यमंत्र्यांशी पण चर्चा करावी लागेल आणि चर्चेअंती निर्णय घेऊ, आता घेता येणार नाही असे फडणवीस म्हणाले.
