पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. विविध विषयांवर त्यांनी भाष्य केले आहे.
त्या म्हणाल्या, “त्यांच्या पक्षात गेलेले अनेक नेते असं सांगतात की आपण भारतीय जनता पार्टी सोबत जर गेलो तर आपल्याला अनेक प्रकरणात क्लीनचिट मिळते. म्हणून भारतीय जनता लॉन्ड्री झाली आहे. त्यांच्या आमदारांपैकी 50 टक्के आमदार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहे. सत्ता देखील स्थापन करताना जे सोबत आहेत तो पक्ष फुटलेलाच आहे. पक्षाला मोठं करणारा कार्यकर्ता आता त्यांच्यात दिसत नाही, सगळे नवीन चेहरे दिसतात.
तसेच, गेल्या दोन-तीन वर्षात जी महागाई वाढली आहे त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. दिवाळी तोंडावर आहेत. आता तुम्ही दिवाळीचा फराळ व्हॉट्सअॅपवर पाठवा. वाढत्या महागाईचा विचार भारतीय जनता लॉन्ड्रीने करावा, असे आवाहनही त्यांनी केले.