सिंधुदुर्ग: “आज शिखांनी आक्षेप घेतला उद्या राजस्थान मधील राजपूत, कर्नाटकातील रेड्डी म्हणतील भावना दुखावल्या. ढाल तलवार हे आमचं चिन्ह आहे, असे वक्तव्य माध्यमांशी बोलताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या चिन्हावर शीख समुदायाने घेतलेल्या आक्षेपावर बोलताना शहाजी पाटील यांनी केले.
तसेच ते म्हणाले, “दोन राऊतांवर माझा लई राग आहे आमचं सगळं वाटोळं या दोन राऊतांनी केलं. आमच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्यात दरी पडली, त्यात या दोन्ही राऊतांचा मोठा वाटा आहे. याशिवाय, या दोघांसोबतच आणखी दोघं-तिघं यासाठी कारणीभूत असल्याची टीका सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, सिंधुदुर्गात एका कार्यक्रमासाठी शहाजी पाटील आले होते. त्यावेळी ते बोलत होते.