Latest Marathi News

जत : दुचाकीची समोरासमोर झालेल्या धडकेत दोघेजण ठार

0 451

जत : उमदी (ता.जत) पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या उमदी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवार दिनांक १५ रोजी दुपारी १२ च्या दरम्यान दोन दुचाकीची समोरासमोर झालेल्या धडकेत दोघेजण ठार झाले. अपघाताची नोंद जत पोलिसांत झाली आहे. भीमराव मायाप्पा पडवळे (वय ५२, रा. शिवनगी ता. मंगळवेढा जि.सोलापूर) हे जागीच ठार झाले. तर इराप्पा तमाराया बिराजदार (वय, २२ रा. उटगी, ता. जत) या तरुणाला सांगली येथे उपचाराला नेत मृत्यू झाला.

 


याबाबत अधिक माहिती अशी, शिवणगी येथील भीमराव पडवळे हे मोटरसायकल वरून पंढरपूर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरून शेवाळे वस्तीकडे जात होते. दरम्यान उटगी येथील युवक याच महामार्गावरून मंगळवेढ्याकडे जात होता. दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात भीमराव पडवळे हे जागीच ठार झाले. तर इराप्पा हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचाराकरिता सांगलीला नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

Manganga

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!