Latest Marathi News

विटा : विधानसभेला आमची मदत घेवून आमच्यावर उलटणाऱ्यांना योग्य वेळी नक्की जागा दाखवून देवू : आम. गोपीचंद पडळकर यांचा आम. बाबर यांना इशारा

0 1,432

विटा : २०१९ च्या विधानसभेला आमची मदत घेऊन आमच्यावरच उलटणाऱ्यांना योग्य वेळी नक्की जागा दाखवून देईन, असा इशारा भाजपचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार अनिलराव बाबर यांना जाहीरपणे दिल्याने खानापूर विधानसभा मतदारसंघात शिंदे गट व भाजप यांच्यात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

विटा येथे सांगलीचे नूतन पालकमंत्री पालकमंत्री सुरेश खाडे यांचा सत्कार विटा शहर भाजप आणि खानापूर तालुका भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आम. गोपीचंद पडळकर, आम. अनिलभाऊ बाबर आदी प्रमुख उपस्थित होते.

Manganga

 


यावेळी बोलताना आमदार पडळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक केले. त्याचबरोबर २०१९ ला माझ्या हातून जी चूक झाली ती पुन्हा होवू देणार नाही. अन्याय आम्ही सहन करणार नाही. आमची मदत घेवून जर कोणी आमच्यावर उलटत असेल तर त्याला योग्य ती जागा दाखवून देवू असा इशारा देखील त्यांनी आम. अनिलभाऊ बाबर यांना दिला. मतदार संघामध्ये ज्या-ज्या अडचणी असतील त्या-त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे पुन्हा एकदा खानापूर मतदार संघामध्ये शिंदे गट व भाजप यांच्यात दुरावा निर्माण होणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!