नवी दिल्ली: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या कर्नाटकात आहे. आज, शनिवारी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्ला केला आहे. महागाईच्या मुद्द्यावरुन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना धारेवर धरलं आहे.
ते म्हणाले, पंतप्रधानांनी दरवर्षी 2 कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते, ते आज आपल्या तरुणांचा सामना करू शकतात का? एलपीजी सिलिंडरची किंमत ४०० रुपये असल्याची तक्रार पंतप्रधान करत होते. आता त्याची किंमत एक हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, ते आज आपल्या लोकांना उत्तर देऊ शकेल का?, तसेच ८ वर्षात तुम्ही भारताला विक्रमी बेरोजगारी आणि महागाई दिली आहे असा हल्लाबोल करत “पंतप्रधान महोदय ७० वर्षांत हे कधी झालं नाही” असा टोला त्यांनी नरेंद्र मोदींना लगावला आहे.
