Latest Marathi News

BREAKING NEWS

आटपाडी : शेटफळे गावाने विधवा महिला बाबत घेतला क्रांतीकारी निर्णय : अनिष्ठ प्रथांना दिली मुठमाती : व्यासपीठावरच विधवा महिलांच्या अश्रुचा बांध फुटला !

0 1,481

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील शेटफळे गावामध्ये विधवा महिलाची खणा-निरळाने ओटी भरून हळदी कुंकवाचा मानाचा मोठा सोहळा पार पडला. यावेळी विधवा अनिष्ट प्रथेला गावातून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावकरी आणि महिलांनी उत्स्फूर्तपणे क्रांतीकारक पाऊल टाकत कायमची मुठमाती दिली. यावेळी व्यासपीठावरच ओटी भरलेल्या अनेक विधवा महिलांच्या अश्रुचा बांध फुटला.

शेटफळे हे गाव जाहीर व्यासपीठावर गावातील शेकडो महिलांनी विधवांची ओटी भरणारे आणि हळदी कुंकवाचा मान परत देणारे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे. विधवा प्रथा बंदीचा शासनाने कायदा केला आहे. त्याप्रमाणे शेटफळे ग्रामपंचायतीने मासिक बैठकीत आणि ग्रामसभेत ठराव घेतला होता.

Manganga

 


विधवा विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा लतादेवी बोराडे आणि सुवर्णा पाटील यांच्या उपस्थितीत ग.दि. माडगूळकर स्मारकामध्ये विधवांची ओटी भरत हळदीकुंकवाचा मोठा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सरपंच सुप्रिया गायकवाड, उपसरपंच विजय देवकर उपस्थित होते. याप्रसंगी लतादेवी बोराडे, सुवर्णा पाटील, एस.एस.गायकवाड आणि प्रा.सी.पी. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गावातील चाळीस पेक्षा अधिक विधवा महिलाची ओटी भरून त्यांना हळदी कुंकू लावण्यात आले.

यावेळी गावातील विधवा प्रथा कायमची बंद करण्याची महिलांनी शपथ घेतली. विधवा शब्दाऐवजी सक्षम महिला शब्द वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढे विधवा महिलानी कायमस्वरूपी सौभाग्य लेणी आणि हळदीकुंकू लावण्याचा निर्णय घेतला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!