आटपाडी :. सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यात संपर्क अभियान सुरू असून राज्यातील माळी समाज सावता परिषदेच्या माध्यमातून एकीची वज्रमूठ बांधत असल्याचे प्रतिपादन संघटनेचे मुख्य संघटक संतोष राजगुरू यांनी व्यक्त केले. ते संघटनेच्या सांगली येथे जिल्हा बैठकप्रसंगी बोलत होते.
नुकतीच सावता परिषदेची सांगली जिल्ह्याची बैठक मुख्य संघटक संतोष राजगुरू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी राजगुरू म्हणाले की, सावता परिषद ही माळी समाजाचे सक्रीय संघटन असणारी राज्यव्यापी संघटना आहे. राज्यातील माळी समाजाचे दिशादर्शक संघटन आहे. या माध्यमातून समाजाची ऐक्य निर्माण होत आहे.

बैठकी प्रसंगी सांगली जिल्हा अध्यक्ष रणजित शिदे, सांगली सोशल मिडिया प्रमुख नितीन माळी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या सुचनेनुसार नवीन नियुक्त्या सावता परिषदेचे मुख्य संघटक संतोष राजगुरु व प्रदेश सचिव सावता पुसावळे यांनी केल्या.
यामध्ये सांगली जिल्हा उपाध्यक्ष अतुल ढोक, आटपाडी तालुका अध्यक्ष पदी विशाल यादव यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या कार्यक्रमास शिक्षक बँकेचे माजी चेअरमन यु.टि. जाधव सर, बजरंग फडतरे, प्रकाश शिंदे ग्रा.पं.सदस्य दिघंची, चंद्रकांत पुसावळे ग्रा.पं.सदस्य दिघंची, दिपक शिंदे, पिंटु भाळवणकर, दत्ता यादव, नवनाथ पुसावळे, विठ्ठल पुसावळे, संदिप शिंदे, शांताराम यादव, रोहित यादव, अक्षय शिलवंत, समाधान शिणगारे, राहुल औंधकर, विनोद पुसावळे, बाळासो ढोक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सांगली जिल्ह्यात गावागावत प्रत्येक तालुक्यात सावता परीषदेची बांधणी करणार अशी नवीण नियुक्त पदाधिकार्यांनी निर्धार केला.