बुलडाणा : बुलडाणा तालुक्यातील ढालसावंगी हे गाव गेल्या तीन महिन्यापासून अंधारात आहे. याकडे विज वितरण कंपनीचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. ग्रामस्थांनी वारंवार विज वितरण कंपनीकडे तक्रारी निवेदन दिली.
मात्र विज वितरण कंपनीला जाग आली नाही. शेवटी ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाची भूमिका घेत गावातील मोबाईल टावरवर चढून शोले आंदोलन सुरु केले.

ढाल सावंगी गावातील नागरीकांनी आज टावरवर चढून शोले आंदोलन केले. यावेळी गावातील फिडर तातडीने सुरु करावे अशी मागणी केली. शिवाय दुरूस्तीे केली नाही; तर यापेक्षा उग्र आंदोलन करू असा ईशारा आंदोलकांनी दिला आहे.