मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. ठराव जिंकल्यानंतर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विधासभेत भाषण केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे भावविक आवाहन केलं आहे.

‘एकनाथ शिंदेजी हे तुम्हाला लढवत आहेत. रक्तपात शिवसेनेचा होईल. शिवसैनिक घायाळ होतील. 25 वर्षांचा इतिहास पाहिला तर शिवसेना संपवणं हा एककलमी कार्यक्रम आहे’. असा आरोप भास्कर जाधव यांनी केला.
‘तुमच्यावर यांचं प्रेम नाही तुम्ही मुख्यमंत्री झालात याचा आनंद आहे. पण शिवसेना वाचवण्यासाठी दोन पावलं मागे घ्या. जर शिवसेना फुटू दिली नाहीत तर महाराष्ट्र डोक्यावर घेऊन नाचेल’ असंही भास्कर जाधव म्हणाले. ‘संजय राठोड यांचं मंत्रिपद घालवण्यासाठी तुम्ही आंदोलन केले.