Latest Marathi News

BREAKING NEWS

शिंदे सरकार जिंकताच आदित्य ठाकरे उठून गेले! तर शिंदे सरकारला मिळाला दिलासा…

0 397

मुंबई: विधानसभेचं अध्यक्षपद जिंकत शिंदे भाजपा सरकारने मोठा विजय मिळवला आहे. आता त्यांची दुसरी कसोटी आज विधानसभेत लागणार आहे. शिंदे सरकार विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहे. हा विश्वासदर्शक ठराव आम्ही बहुमताने जिंकू असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांनीही व्यक्त केला आहे.

फडणवीसांनी सभागृहात जोरदार फटकेबाजी केली आहे. मी पुन्हा येईन, असं म्हणालो, तेव्हा अनेकांनी माझी थट्टा केली. पण आता मी पुन्हा आलोय आणि यांना सोबत घेऊन आलोय, असंही देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले आहेत.
त्याचबरोबर माझी टिंगल करणाऱ्यांचा मी बदला घेणार, असा इशाराही त्यांनी दिला. मात्र पुढे लगेचच माझा बदला म्हणजे मी त्यांना माफ केलं हा आहे, असंही फडणवीस म्हणाले.

Manganga

शिरगणती सुरू झाल्यानंतर विजय वडेट्टीवार आणि अशोक चव्हाण विधानभवनात दाखल झाले आहेत. त्यामुळे आता ते मतदान करू शकणार नाहीत. तर आदित्य ठाकरे अगदी शेवटच्या क्षणी विधानभवनात दाखल झाले आहेत. काँग्रेसचे पाच आमदार सभागृहाबाहेरच राहिले आहेत. तर अपक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी भाजपाच्या बाजूने मतदान केलं आहे.
आत्तापर्यंत बहुमतापेक्षा जास्त मतं शिंदे सरकारच्या बाजूने मिळालेली आहेत. त्यामुळे शिंदे सरकारला दिलासा मिळाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!