हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे भीषण बस अपघात झाला आहे. साईंज घाटात सोमवारी सकाळी बस दरीत कोसळली. बसमध्ये एकूण ४५ लोक प्रवास करत होते. यापैकी १६ जणांचा मृत्यू झाला आहे. बसमध्ये काही शाळकरी मुल होती. ही मुल शाळेसाठी जात होते. बस जात असताना दरीत कोसळली.

ही बस हिमाचल प्रदेश येथील साईंज खोऱ्यातील शेनसार येथून साईंजच्या दिशेने येत होती. यावेळी जंगला नावाच्या ठिकाणी चालकाचा बसवरील नियंत्रण सुटले, यात ती बस दरीत कोसळली.
शाळेच्या दिशेने जाणाऱ्या या बसमध्ये स्थानिक लोकांव्यतिरिक्त शाळकरी मुलेही प्रवास करत होते. बसच्या अपघाताची माहिती मिळाली असून पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. घटनास्थळी मदत सुरु आहे. अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.