मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठरावाची लढाई जिंकली आहे. यानंतर अभिनंदन प्रस्ताव मांडताना उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं. यावेळी फडणवीसांनी विरोधकांनाही चांगलचं धारेवर घेतले. “माझी टिंगल-टवाळी केली पण मी पुन्हा आलो आणि एकटा आलो नाही तर यांना घेऊन आलो” असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले की, मी तेव्हा कविता केली होती मी पुन्हा येईन… तेव्हा माझी टिंगल-टवाळी केली. पण मी पुन्हा आलो आणि एकटा आलो नाही तर यांनाही घेऊन आलो असं फडणवीस म्हणाले. तसेच मी आता या सर्वाचा बदला घेणार, हा बदला म्हणजे मी यांना माफ करणार असा टोलाही फडणवीसांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.
आपल्या भाषेच देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार यांनी संघ आणि संघाची शिस्त याचा उल्लेख केला. मनसे नेते राज ठाकरे यांनी खूप सुंदर पत्र लिहीले. मी त्यांचे फोन करून आभार मानले, मी त्यांची भेट घेणार आहे. काही लोक ओरडत होते ईडी-ईडी पण हे खरंच आहे ही ईडी म्हणजे देवेंद्र आणि एकनाथ शिंदे आहेत असा टोलाही त्यांनी लगावला आहे.