Latest Marathi News

BREAKING NEWS

आई घरात नसताना काकानेच केला पुतणीवर लैंगिक अत्याचार आणि पुतण्यावर अनैसर्गिक अत्याचार!

0 768

पुणे : पती घर सोडून निघून गेलेला. मुलाच्या प्रसूतीसाठी ती ससून रुग्णालयात दाखल झाली. घरी ८ व ४ वर्षांची मुलगा व मुलगी एकटीच होती. दीर त्यांना घेऊन स्वत:च्या घरी गेला. तिला मुलगा झाला. घरी आल्यावर मुलीची व मुलाची अवस्था पाहिल्यावर तिने चौकशी केली. या दोघांनी सांगितलेल्या हकीकतीने तिच्यावर जणू आभाळच कोसळले. तिने लोणी काळभोर पोलिसांकडेधाव घेतली. पोलिसांनी या ३० वर्षांच्या काकाला अटक केली आहे. याप्रकरणी वडकी येथे राहणाऱ्या एका ३० वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली.

 

याबद्दल अधिक माहिती अशी कि, या महिलेला पहिल्या पतीपासून एक मुलगा (वय ८) व मुलगी (वय ४) आहे. ती दुसऱ्या पतीबरोबर गेल्या ५ महिन्यांपासून राहते. गेल्या ४ महिन्यांपासून तिचा दुसरा पती निघून गेला आहे. भंगार गोळा करून ती उपजीविका करत होती. दिवस भरल्याने शेजाऱ्यांकडे दोन मुलांना सोपवून ती ससून रुग्णालयात गेल्या २० मे रोजी दाखल झाली. तिला मुलगा झाला. २३ मे रोजी तिला रुग्णालयातून सोडण्यात येणार होते. तिने मोठ्या दिराला फोन करून बोलावले. त्यांनी तिला वडकी येथील घरी सोडले. शेजारी चौकशी केल्यावर तिचा धाकटा दीर मुलांना घेऊन त्याच्या घरी गेल्याचे समजले.

Manganga

 

दुसऱ्या दिवशी तीन पिंपळमळा येथून मुलांना घेऊन घरी आली. मुलांच्या अंगावर वळ दिसल्याने तिने विचारल्यावर दिराने उडवाउडवीची उत्तरे दिली. दुसऱ्या दिवशी मुलांना आंघोळ घालताना मुलीबाबत काहीतरी वाईट घडल्याचे तिच्या लक्षात आले. तिने चौकशी केल्यावर छोट्या काकाने अत्याचार केल्याचे चार वर्षांच्या मुलीने सांगून त्याचा खूप त्रास होत असल्याचे सांगितले. मुलाचीही तीच अवस्था होती. त्याच्यावर काकाने अनैसर्गिक अत्याचार केला होता. लोणी काळभाेर पोलीस तपास करत आहेत. (सौ. लोकमत)

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!