मुंबई – विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अशातच आता आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांवर जोरदार टीका केली. शिवसेनेचे व्हीप अधिकृत आहे असेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. शिवसेनाच व्हीपच अधिकृत आहे. तोच मानावा लागेल. ही नैतिकतेची टेस्ट आहे. हा विश्वासघात आहे की आणखी काय? असा सवाल त्यांनी केला. आरेचा निदर्शनाला मी जाऊ शकलो नाही. आम्हाला धोका दिलात तर चालेल पण मुंबईकरांना देऊ नका. असे आवाहन आदित्य ठकरे यांनी केले आहे. विधानभवनातील शिवसेना विधानभवन कार्यालय आम्हीच सील केलं आहे. त्याची चावी आमच्याकडेच आहे अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
तसेच, पुढे भाजपवर टीका करत ते म्हणाले की, आमचे सर्व आमदार मित्र पक्ष आहे आज त्यांच्यासोबतच बसायचे आहे. आम्ही एक कुटुंब आहोत. स्पीकर इलेक्शनमध्ये एक शिवसैनिक आणि दुसरा माजी शिवसैनिक आहे. त्यात भाजपला काय मिळालं?, असा टोला आदित्य ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.