मुंबई: विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांची निवड झाली. अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर, तर शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाले.
राहुल नार्वेकर यांना आतापर्यंत १४५ पेक्षा जास्त सदस्यांचे मतदान झाले आहे. बहुजन विकास आघाडी, मनसे आणि बच्चु कडू यांच्या पक्षाने राहुल नार्वेकर यांना मतदान केले आहे.
