मुंबई: अधिवेशनाच्या सुरुवातीलाच माजी मंत्री जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे अभिनंदन केले आहे.
आम्ही अनेकदा सांगितले अध्यक्ष निवडणूक घ्या. पण राज्यपाल यांनी काही मनावर घेतले नाही. त्यांनी आमची विनंती मान्य केली नाही. ते कशाची वाट पाहत होते ते आम्हाला आता कळाले. आधीच सांगितले असते तर एकनाथ शिंदे आधीच केले असते. आता राज्यपाल यांनी आम्ही पाठवलेल्या बारा नावांच्या यादीला मान्यता द्यावी मग आम्ही समजू राज्यपाल समान वागले, असे जयंत पाटील यांनी वक्तव्य केले.

दरम्यान, विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर, तर शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत होणार आहे.