मुंबई: शिवसनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ३९ आमदारांसह बंडखोरी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आहे. यावरुन आता राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
अशातच आता संजय राऊत म्हणाले कि, मला बाहेरुन प्रमुख नेत्यांचे फोन येत आहेत. एवढी पोलिसांची सुरक्षा का आहे, काही अतिरेकी हल्ला झाला आहे का? अश अनेकजण विचारत आहेत. बंडखोर आमदारांना एवढी सुरक्षा दिली जात आहे, असे संजय राऊत म्हणाले.

तसेच, तुमच राज्य कशापद्धतीने आले हे राज्याने पाहिले आहे. तरीही आम्ही तुम्हाला राज्य चालवण्यासाठी शुभेच्छा देत आहे. आम्ही पक्षासाठी झोकून काम करु. शिवसेना गरुड झेप घेईल. ४० आमदारांच्या गटाला तुम्ही आज जर मुख्यमंत्री पद देत आहात, तर मग २०१९ साली शिवसेना हक्काची मागणी करत असताना तेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला तुम्ही का नाकारलं असा प्रश्नही राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.