Latest Marathi News

कोरोनाबाधितांमध्ये वाढ:   देशात ‘इतके’  नवीन कोरोनाबाधित!

0 186

 

नवी दिल्ली:  देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात 16 हजारहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. देशात सध्या कोरोनाचे 1 लाख 11 हजार 711 सक्रिय रुग्ण आहेत. देशात शनिवारी दिवसभरात 16 हजार 103 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात मागील 24 तासांत 31 रुग्णांचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

 

 

Manganga

तसेच,  गेल्या 24 तासांत 13 हजार 929 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 4 कोटी 28 लाख 65 हजार 519 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत.

 

दरम्यान,  राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवासंपासून घट होत आहे. महाराष्ट्रात 2971 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली. तर 3515 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत 78,10,953 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 85 टक्के झाले आहे.  सध्या 23447 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत पाच कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!