Latest Marathi News

BREAKING NEWS

“लग्नापूर्वीच गरोदर असणं म्हणजे…”; अभिनेत्री दिया मिर्झाने मांडले स्पष्ट मत!

0 1,116

मुंबई: अभिनेत्री दिया मिर्झा लग्नापूर्वीच गरोदर राहिली. आपण गरोदर असल्याचे कळताच दियाने वैभव रेखी याच्याशी लग्नगाठ बांधली. फक्त दियाच नव्हे तर बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींच्या बाबतीत देखील असेच घडताना दिसले. पण लग्नापूर्वीच गरोदर असणे कितपत योग्य आहे? याबाबत दियाने स्पष्टपणे आपले मत मांडले. अभिनेत्री आलिया भट्ट लग्नाच्या २ महिन्यानंतर गरोदर असल्याचे समजताच दिया याविषयावर बोलली.

 

दियाने एका वाहिनीवर दिलेल्या मुलाखतीमध्ये लग्नापूर्वीच गरोदर असण्यावर आपले मत मांडले. ती म्हणाली कि, “आपल्या समाजामध्ये बरेच लोक असे आहेत की लग्नापूर्वी सेक्स आणि गरोदर असणे याकडे विचित्र नजरेने पाहतात. पण काही लोक असेही आहेत की ज्यांना या गोष्टी आपल्या आवडीनुसार करायला आवडतात. लग्नापूर्वीच सेक्स किंवा गरोदर असने ही प्रत्येकाची निवड आहे. आपण मनमोकळ्या विचारांचे आहोत असे समाजामध्ये वावरणाऱ्या काही लोकांना वाटते. पण प्रत्यक्षात तसं काहीच नसतं.”दियाच्या या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे.

Manganga

दरम्यान, २०२१मध्ये दियाने व्यावसायिक वैभव रेखीशी लग्न केले. लग्नाच्या काही महिन्यानंतरच तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. लग्नानंतर काही दिवसांनी आपण गरोदर असल्याचे दियाने सोशल मीडियाद्वारे सांगितले. यामुळे तिला ट्रोलिंगचा सुद्धा सामना करावा लागला होता. मात्र ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत तिने आपल्या आयुष्यामधील प्रत्येक क्षण हे एण्जॉय केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!