नवी दिल्ली: १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४८,००० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,८५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. चांदी ५७,८०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
जाणून घ्या तुमच्या शहरातील सोने – चांदीचे दर!
एका वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४८,००० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,३४० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,०५० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,३९० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,०५० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,३९० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,०५० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,३९० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५७८ रुपये आहे.
