नवी मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न स्थापने पासून होत होता. हा प्रयत्न त्यांचा यशस्वी झाला. आता आम्ही विरोधीपक्ष म्हणून काम करण्याची तयारी केली असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी वक्तव्य केले.
तसेच, आमदार शशिकांत शिंदे म्हणाले दोन ते तीन वेळ फूट पडली. परंतु, नेते जातात शिवसैनिक कुठेही जात नाही. त्यामुळे थोडा बहुत परिणाम होईल, त्याचप्रमाणे, मुख्यमंत्री म्हणून कोरोना काळात केलेले काम तसेच तिन्ही पक्षांना अधिकार देऊन त्यांनी सरकार चालवून दाखवले. महाराष्ट्रातील जनता फार संवेदनशील आहे. त्यामुळे जनतेचा पाठिंबा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला राहील असा विश्वास व्यक्त करत असे नसते तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते असा जोरदार टोलाही आमदार शशिकांत शिंदे यांनी ठाकरेंचे कौतुक करत फडणवीसांना लगावला.
