मुंबई: आता एकनाथ शिंदे गटानेही सर्व आमदारांना व्हीप जाहीर केला आहे. हा व्हीप शिवसेनेच्या लेटरपॅडवर बजावला आहे, यात राहुल नार्वेकर यांना विजयी करा असा आदेश देण्यात आला आहे.
शिवसेनेने काल सर्व आमदारांना विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी व्हीप जाहीर केला. काल शिवसेनेने व्हीप बजावला होता, या व्हीपमध्ये राजन साळवी यांना विजयी करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक थोड्याच वेळात पार पडणार आहे.