मुंबई: आता शिवसेनेने पक्षाविरोधी काम केलेल्या नेत्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. काल शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई केल्याचे समोर आले होते. आता माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर केल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर पक्षाविरोधात काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेविरोधातील बंडखोरी केल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. शिंदे यांची शिवसेना नेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.