Latest Marathi News

BREAKING NEWS

जगावर कोरोनानंतर मंकीपॉक्सचे संकट! ६७ देशांमध्ये पसरला मंकीपॉक्स व्हायरस!

0 279

नवी दिल्ली: कोरोनानंतर आता जगावर मंकीपॉक्सचे संकट वाढले आहे. युरोपमध्ये ३ पटीने रुग्णांची संख्या वाढली आहे. डब्लूएचओने युरोपमध्ये मंकीपॉक्सचा वाढता प्रसार थांबवण्याचे आव्हान केले आहे. गेल्या दोन आठवड्यात रुग्णसंख्या तिप्पट झाली आहे. १५ जूनपासून युरोपमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णांत तिप्पटीने वाढ झाली आहे.

 

६ मे रोजी ब्रिटनमध्ये मंकीपॉक्स व्हायरसचा रुग्ण आढळला आहे, आतापर्यंत युरोपमध्ये ५,००० हून अधिक रुग्ण आढळली आहेत. इतके रुग्ण ओळखले आहेत. आतापर्यंत ६७ देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. त्यातील ६,२२९ रुग्णांची टेस्ट झाली आहे. यातील ६,१७८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर ५२ रुग्ण संशयास्पद आहेत.

Manganga

 

युरोपमध्ये मंकीपॉक्सचे ५,२६२, उत्तर अमेरिकेत ६९२, दक्षिण अमेरिकेत ९२, आशियामध्ये ६४, आफ्रिकेत ३५ आणि ओशनियामध्ये १२ रुग्ण आढळले आहेत. मंकीपॉक्सचा १० देशांमध्ये जास्त प्रसार झाला आहे. यामध्ये ब्रिटन, स्पेन, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, पोर्तुगाल, कॅनडा, नेदरलँड्स, इटली आणि बेल्जियम या देशांचा समावेश आहे.

 

दरम्यान, या आजाराचा प्रसार रोखायचा असेल तर त्वरित आणि समन्वित उपाययोजना करणे आवश्यक आहे. मंकीपॉक्सचे रुग्ण हजारोपर्यंत पोहोचलेले बहुतेक देश युरोपमधील आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला मंकीपॉक्सचे रुग्ण वाढले आहेत या प्रसाराबद्दल चिंता वाटत असल्याचे डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयसस म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!