Latest Marathi News

आजचे राशीभविष्य, रविवार ३ जुलै २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 660

मेष:-
व्यावसायिक स्थितीत काही अनुकूल बदल होऊ लागतील. सामाजिक गोष्टींचे भान राखावे. मात्र कोणतेही मोठे निर्णय तूर्तास घेऊ नयेत. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा. कामातील काही बाबींमध्ये स्थैर्य लाभेल.

 

वृषभ:-
चांगला व्यावसायिक लाभ होईल. उगाचच शब्दांचा अति वापर करू नका. स्थावरच्या व्यवहारातून लाभ होईल. मनातील इच्छा पूर्ण कराल. संयम टिकवून ठेवावा लागेल.

Manganga

 

मिथुन:-
अघळ-पघळ बोलणे टाळावे. गरज भासल्यास थोडी माघार घेण्यास हरकत नाही. स्वत:साठी थोडा वेळ काढावा. मुद्यांपासून दूर जाऊ नका. कामाचा ताण जाणवेल.

 

कर्क:-
नियम व अटींचे पालन करावे. व्यावसायिक अनुकूलता मिळेल. हातातील कामात यश येईल. प्रवासात सतर्क राहावे लागेल. इतरांचा विचार आधी करावा लागेल.

 

सिंह:-
तुमच्यातील सुप्त गुणांना वाव मिळेल. औद्योगिक प्रतिष्ठा जपाल. अतिविचार करण्यात वेळ वाया जाईल. नवीन गुंतवणूक करताना सावध राहावे. अनुकूलतेसाठी फार काळ वाट पहावी लागणार नाही.

 

कन्या:-
भागीदारीत चांगला लाभ होईल. रहाणीमान सुधारण्यास वाव आहे. पत्नीची कामात उत्तम साथ मिळेल. उगाच गैरसमजाला खतपाणी घालू नका. अपेक्षित लाभणे खुश व्हाल.

 

तूळ:-
हातातील कामांना गती येईल. पैज जिंकण्याचा अट्टाहास करू नका. स्वत:चे खरे करायला जाल. कमतरता भरून निघण्यास सुरुवात होईल. नसते साहस करताना सारासार विचार करावा.

 

वृश्चिक:-
नवीन प्रश्न मार्गी लावाल. आव्हाने पेलायला बळ मिळेल. मनातील शंका-कुशंका संपतील. आर्थिक जुळवाजुळव करावी लागेल. कामातून इच्छित ध्येय साध्य करता येईल.

 

धनू:-
प्रतिकूलतेतून मार्ग काढाल. अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन घ्यावे. घरात शांतता जपण्याचा प्रयत्न करावा. वरिष्ठांशी तेढ वाढवू नका. प्रामाणिक मार्ग स्वीकारा.

मकर:-
नवीन जोमाने कामे करा. धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. कामाची थोडीफार धांदल राहील. पारमार्थिक क्षेत्रातील लोकांची भेटीचा योग येईल. भावंडांशी मतभेद वाढवू नका.

 

कुंभ:-
कामाचा आवाका लक्षात घ्यावा लागेल. कौटुंबिक बाबी शांततेने हाताळाव्यात. काही अनपेक्षित जबाबदार्‍या येऊ शकतात. योग्य नियोजनावर भर द्यावा लागेल. नोकरदारांचा उत्साह वाढीस लागेल.

मीन:-
तांत्रिक बाबी जाणून घ्याव्या लागतील. लहान-सहान गोष्टी मनावर घेऊ नका. महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावी लागतील. डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!