Latest Marathi News

“…तर भविष्यात राजकारण करायला माणूस नावाचा प्राणी….”! ‘यांची’ पोस्ट चर्चेत!

0 378

मुंबई: मुंबईतील आरे कॉलनीत मेट्रो कारशेड उभारण्यावरून पुन्हा एकदा मुंबईतील राजकारण तापलं आहे. आरेतील प्रस्तावित कारशेड कांजूरमार्ग येथे नेण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपचं सरकार सत्तेत आल्यानंतर हा निर्णय बदलून मेट्रो कारशेड प्रस्तावित आरेच्या जागेतच होणार असा निर्णय शिंदे सरकारने घेतला. त्यावर माझ्या पाठीत ज्या प्रमाणे खंजीर खुपसला तरा मुंबईच्या काळजात कट्यार खुपसू नका, असं म्हटलं होतं. त्यांना उत्तर देताना कारशेड आरेतच होणार, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

प्रस्तावित मेट्रो कारशेडवरून उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्यात जुंपली असतानाच, मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यावरणप्रेमी अमित ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आरेतील मेट्रो कारशेडबाबतच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती केली आहे. तसेच पर्यावरण उद्ध्वस्त झालं तर, भविष्यात राजकारण करण्यासाठी माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहणार नाही, याचं भान सर्व राजकीय नेत्यांनी बाळगायला हवे, असे परखड मत अमित ठाकरे यांनी मांडले आहे.

Manganga

 

अमित ठाकरे यांची फेसबुक पोस्ट  खालीलप्रमाणे:
‘मेट्रो कारशेड आरे जंगलातच करण्याचा नव्या सरकारने घेतलेला निर्णय माझ्यासारख्या असंख्य पर्यावरणप्रेमींसाठी धक्कादायक आहे. आरेमध्ये कारशेड होऊ नये म्हणून शेकडो तरुण-तरुणींनी संघर्ष केला होता. काहींना तर पोलिसांनी गजाआड टाकलं होतं.

 

आपल्याला विकास हवाच आहे, पण पर्यावरणाचा बळी देऊन नको. आपलं पर्यावरण उद्ध्वस्त झालं तर भविष्यात राजकारण करायला माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहणार नाही, याचं भान सर्व राजकीय नेत्यांनी बाळगायला हवं. नवे मुख्यमंत्री आणि नवे उपमुख्यमंत्री यांनी आरेतील मेट्रो कारशेडबाबतच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, ही आग्रहाची विनंती.’
मुंबईचा ‘श्वास’ असलेल्या आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारणीवरून राजकीय वातावरण तापलं आहे. एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मेट्रो कारशेड आरेमध्येच होणार असा निर्णय घेण्यात आला होता. त्यावर उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीका केली होती. त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी कारशेड आरेतच होणार असे सांगितले होते. आरेमध्ये ज्या जागेवर कारशेडचे २५ टक्के काम झाले आहे. त्याच जागेवर १०० टक्के काम होईल. हे मुंबईच्या हिताचेच आहे. कारण मुंबईतील मेट्रो सुरू होऊ शकते. तर आरे जंगल वाचवण्यासाठी आम आदमी पक्ष मैदानात उतरला होता. त्यांच्या वतीने या निर्णयाचा विरोध करण्यात आला होता. (सौ. साम)

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!