तिरुअनंतपुरम : केरळमधील कल्लंबलमजवळ शनिवारी सकाळी एकाच कुटुंबातील पाच सदस्य त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले. मृतांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.
याबद्दल पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, घराचा मालक एका खोलीत गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळला तर इतर चार सदस्य जमिनीवर पडलेले आढळले. त्यांनी विष प्राशन केल्याचा संशय आहे. मृतांमध्ये घरमालक, त्याची पत्नी आणि दोन मुले यांच्याशिवाय आणखी एका महिला नातेवाईकाचा समावेश आहे.

दरम्यान, प्राथमिक तपासात हे सामूहिक आत्महत्येचे प्रकरण असल्याचे समोर येत आहे. अशी माहिती मिळत आहे की, हे कुटुंब काही आर्थिक समस्यांमुळे चिंतेत होते, परंतु आम्ही सविस्तर तपासणीनंतरच अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो. तसेच सदर घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.