मुंबई – गुरूवारी भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर, मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या राजकीय सत्तांतराच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस या लंडन दौऱ्यावर आहेत. नुकतेच, लंडनमध्ये त्यांचा ‘इंडिया ऑफ द वर्ल्ड’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री न केल्यामुळे देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची माहिती समोर आली. पण, अमृता फडणवीस यांनीही ट्विट करुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे अभिनंदन केले. अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या कि, ‘आपले (महाराष्ट्राचे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून अभिनंदन आणि वाटचालीसाठी शुभेच्छा’, असे ट्विट करत त्यांनी दोघांचे अभिनंदन केले.
त्यानंतर, आज पुन्हा एकदा त्यांनी ट्विटरवरुनच लंडन दौऱ्याची माहिती दिली. तसेच, ‘इंडिया ऑफ द वर्ल्ड’ ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचेही सांगितले.
It was an honour to speak on ‘Indo-UK relations’ at UK Parliament & also received ‘Indian of the World’ award at UK Parliament.
Today,with efforts of our PM @narendramodi ji,India-UK relation has become robust & is expanding at federal,state & local levels🙏#London @RamiRanger pic.twitter.com/joWYQx5NRj— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) July 2, 2022
ब्रिटनच्या संसदेत ‘इंडो-यूके संबंध’ या विषयावर बोलणे आणि ब्रिटनच्या संसदेत ‘इंडियन ऑफ द वर्ल्ड’ पुरस्कार प्राप्त करणे, हा सन्मान होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नाने भारत-यूके संबंध मजबूत झाले आहेत. तसेच, हेच संबंध विविध राज्य आणि स्थानिक पातळीवरही विस्तारत आहेत, असेही अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले.