मुंबई: मुंबई आणि उपनगरांत काल, शुक्रवारपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा मुंबईतील नागरिकांना बसला. शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्री जोरदार पावसाच्या तडाख्यानं चुनाभट्टीतील चार घरे कोसळली. सुदैवाने या दुर्घटनांमध्ये कुणीही जखमी अथवा जीवितहानी झाली नाही.
मुंबई आणि उपनगरांमध्ये काल, शुक्रवारपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पावसाची संततधार सुरूच आहे. या पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण उडाली. अनेक भागांतील रस्त्यांवर पाणी साचले होते.

शुक्रवारी आणि शनिवारच्या दरम्यान मध्यरात्री मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे मुंबईतील चुनाभट्टीत चार घरे कोसळल्याची घटना घडली. या घटनेत घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कुणीही जखमी अथवा जीवितहानी झाली नाही, अशी माहिती देण्यात आली.