मुंबई : पक्षाविरोधात बंडखोरी करत भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेनं मोठी कारवाई केली.
थेट एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेते पदावरून हकालपट्टी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही हकालपट्टीची कारवाई केली. दरम्यान, शिंदे यांना नेतेपदावरून हटवल्यानंतर आता शिंदे गट आक्रमक झाला आहे.
उद्धव ठाकरेंच्या या कारवाईनंतर शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदेंना नेतेपदावरुन हटवणं चुकीचं आहे. आम्ही कायदेशीर कारवाई करणार असल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलं. शिवसेनेनं अशी कृती करायला नको होती. शिवसेनेची ही कृती लोकशाहीला शोभणारी नाही. आजही आमच्या हातात शिवबंधन आहे, असं म्हणत दीपक केसरकर यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच शुक्रवारी सकाळी माध्यामांशी सवांद साधला. यावेळी बोलताना त्यांनी तीन प्रश्न उपस्थित करत भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले ‘काल ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झालं आणि ज्यांनी हे सरकार बनवले शिवाय तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असं ते म्हणत आहेत.