Latest Marathi News

BREAKING NEWS

नऊ जणांची आत्महत्या प्रकरणी खुलासा! म्हैसाळ हत्याकांडातील मांत्रिकाच्या घराची झडती

0 560

सोलापूर : म्हैसाळ येथील सामूहिक हत्याकांडप्रकरणी सोलापुरातील मांत्रिक अब्बास मोहम्मदअली बागवान याला मिरज पोलिसांनी सोलापुरात आणत काल रात्री त्याच्या मुस्लीम पाच्छा पेठ येथील घराची झडती घेतली. जवळपास आठ तास चाललेल्या या झडतीमध्ये पोलिसांनी त्याच्या घरातून विविध वस्तू जप्त केल्या. यासाठी परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

म्हैसाळ येथील डॉ. माणिक वनमोरे आणि शिक्षक पोपट वनमोरे या बंधूंना गुप्तधनाच्या आमिषाने त्यांच्या कुटुंबातील नऊ जणांना विष पाजून हत्या केल्याचा आरोप मांत्रिक अब्बास बागवान याच्यावर आहे. याप्रकरणी त्याला आणि त्याचा साथीदार धीरज सुरवसे याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान,त्याला सोलापुरात आणल्यानंतर त्याच्या घराची झडती घेण्यास सुरुवात झाली.

Manganga

झडतीच्या वेळी कोणताही व्यक्ती बिल्डिंगच्या आवारात प्रवेश करणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. शिवाय त्यावेळी घराच्या खिडक्याही बंद करण्यात आल्या होत्या,अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी झडती प्रक्रिया थांबवली. त्यानंतर आरोपीला घेऊन पुन्हा सांगलीकडे रवाना झाले,अशी माहिती सूत्रांनी दिली.

संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशाला हादरवून सोडणारी घटना मिरज तालुक्यातील म्हैसाळ या ठिकाणी घडली होती. एकाच कुटुंबातील तब्बल ९ जणांच्या परिवाराने एकाच वेळी विष प्राशन करून आत्महत्या केली होती.
हे सर्वजण उच्चशिक्षित होते, पशुवैद्यकीय डॉक्टर असणारे माणिक वनमोरे व त्यांचे शिक्षक बंधू पोपट वनमोरे, या दोघांनी आपली आपल्या आई, पत्नी व मुलांच्या समवेत सामूहिक आत्महत्या केल्याने एकाच खळबळ उडाली होती. दोन्ही कुटुंबांनी आपल्या घरामध्ये एकाच वेळी विष पिऊन हे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात आला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!